पिंपरद येथे महिलांना लघुउद्योगाबाबत मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । फलटण । टोमेटोसारखी फळे बाजारात 10 ते 15 रुपये किलोपर्यंत मिळतात. पण त्यांच्यावरती प्रक्रिया केलेले केचअप, टोमॅटो सॉस अशा पदार्थांची किंमत 80 ते 90 रुपये असते. अशा गोष्टी लक्षात घेवून प्रक्रिया उद्योगातून महिला घरी बसून कमाई करु शकतात, असे कृषीकन्या दिपा बोराटे यांनी सांगितले.

ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिंपरद (ता.फलटण) येथे महिलांना शेतीशी निगडीत लघु उद्योगांबाबत कृषीकन्या दिपा बोराटे यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी विषय शिक्षक प्रा.एस.एस.भोसले यांचे सहकार्य लाभले.

उपक्रमासाठी कृषीकन्या दिपा बोराटे यांना शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते – पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलवडे, प्रा.एस.एस.एकतपुरे, प्रा.एस.आर.आडत, प्रा.डी.एस.मेटकरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!