पिंपरद येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । फलटण ।महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज आयोजित ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या कृषीकन्या कु.दिपा शरद बोराटे यांनी पिंपरद येथील शेतकर्‍यांना ‘शून्य ऊर्जा शीत कक्षा’चे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.

भाजीपाला, फळे आदी थंड स्थितीत साठवण्यासाठी शून्य ऊर्जा वापरणारा शीत कक्ष म्हणजेच झिरो एनर्जी कूल चेंबर हा एक चांगला व कमी खर्चाचा पर्याय आहे. ताजी फळे, भाज्या त्यात साठवून बाजारात नेईपर्यंत चांगल्या अवस्थेत ठेवता येतात. या कक्षातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा सुमारे 10 – 15 अंश सेल्सिअसने कमी असल्याने याचा कोरड्या ऋतूत जास्त फायदा होतो, असे कृषीकन्या कु.दिपा बोराटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सदरचा कार्यक्रम अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग मोहिते – पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलवडे, प्रा.एस.एम.एकतपुरे, एन.बी.गाढवे, प्रा.एस.आर.आडत, प्रा.डी.एस.मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


Back to top button
Don`t copy text!