दैनिक स्थैर्य । दि.२३ नोव्हेंबर २०२१ । फलटण । वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अंबाजोगाई शासकीय कृषि महाविद्यालयाची कृषिकन्या कु.अंकिता संजय भोसले हिने ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शिंदेवाडी (ता.खटाव) येेथे हुमणी अळी व भुंगेरे नियंत्रणाबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
सदर मार्गदर्शनाप्रसंगी कु.अंकिता भोसले हिने शेतकर्यांना सांगितले की, महाराष्ट्रात हुमणी अळीच्या जीवनप्रक्रिया चार अवस्थांची असते. त्यापैकी नुकसानकारक अवस्था म्हणजेच अळी अवस्था ही अळी पिकाची मुळे खाते व परिणामी पीक वाळून जाते. त्यामुळे वेळीच भुंगेड्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. भुंगेरे गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून व हुमणी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी पीक काढणीनंतर 15-20 से.मी. खोल नांगरट करावी व उघड्या पडणार्या अळ्या रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात. बगळा, चिमणी, मैना, घार आदी पक्षी तसेच मांजर, मुंगुस, कुत्रा आदी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात, असेही अंकिता भोसले हिने शेतकर्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिकन्येस शासकीय कृषि महाविद्यालय, अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.विद्या तायडे व प्रा.डॉ.पुरी, किटकशास्त्र विषय तज्ज्ञ प्रा.डॉ.नरेशकुमार व्यायवार यांचे मार्गदर्शन लाभले.