दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । सातारा । वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, भारतीय रिझर्व बँक, मुंबई कार्यालय यांच्या वतीने आणि बैंक ऑफ़ महाराष्ट्र, जिल्हा अग्रणी बँक, सातारा यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण सभागृह दैत्य निवारणी परीसर कराड येथे 10 जुन 2022 रोजी मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा उद्देश “महिला बचत गट तसेच समाजातील इतर घटकांना बचतीचे महत्त्व, व्यवसायाची उभारणी, बैंकांमार्फ़त व्यवसायासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, मालासाठी तैयार करावयाची घरगुती व अंतरराष्ट्रीय बाजारपेठ, निर्यातिसाठी आवश्यक मार्गदर्शन व उपलब्ध असलेल्या सरकारी योजना, इत्यादी बाबींवर सविस्तर चर्चा आणि मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय रिज़र्व बैंक, मुंबई येथील कल्पना मोरे, बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक युवराज पाटील, नाबार्डचे राजेंद्र चौधरी आरबीआयचे नरेंद्र कोकरे मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचा उद्धेश महिला बचत गटांना ऑनलाइन मार्केटिंग या माध्यमाची ओळख करून देणे तसेच ऑनलाइन मार्केटिंग कशी करायची याची रीतसर माहिती देणे ही होती त्याच बरोबर आपला पदार्थ कश्या प्रकारे बाजारात आणावा व त्याची पॅकिंग आणि ऑनलाइन डिलिव्हरी कशी करायची या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
श्रीमती कल्पना मोरे यांनी समाजातील विविध घटकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळावा व त्यांचे कर्तव्य व अधिकार याची माहिती करून दिली तसेच महिलांनी पारंपरिक पदार्थ बनवत न राहाता वेगळा दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे व आपली प्रगती करण्याचे आवाहन केले महिलांनी packing आणि marketing कडे लक्ष देऊन आपली प्रगती करण्याचे आवाहन केले.
लीनेश निकम यांनी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न खाद्य प्रक्रिया योजने अंतर्गत महिला बचत गटांना पॅकिंग चे महत्व सांगून त्यांना आपल्या पदार्थाला योग्य भाव मिळविण्यासाठी लागणारे तंत्र आणि तांत्रिक माहिती बद्दल अवगत केले.
श्री. नरेंद्र कोकरे यांनी आरबीआय तर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देऊन महिला सक्षमीकरणासाठी केल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिले व प्रत्येक महिलेने पुढे येऊन स्वतःची प्रगती करण्याचे आवाहन केले. देशाच्या प्रगती साठी महिलांचे योगदान आणि त्यांना सरकार मार्फत मिळणाऱ्या योजनांबद्दल ची माहिती दिली तसेच महिलांनी सर्वांगीण विकास अवलंबून आपल्या स्वतःची आणि देशाची प्रगती करण्याचे आवाहन केले.
श्री राजेंद्र चौधरी यांनी नवीन उद्योजकांना नाबार्ड तर्फे व सरकार कडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे सुचविलेतसेच नाबार्डच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.