डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १५ एप्रिल २०२३ । सातारा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री  श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, पुरवठा विभागाचे तहसिलदार अमर रसाळ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम सुरु आहे त्याचा पाया राज्यघटनेमध्ये आहे. त्यांचे विचार पुढे नेणे व त्याप्रमाणे देशाची प्रगती करणे ही आपली जबाबदारी आहे.


Back to top button
Don`t copy text!