आचार्य अत्रे यांच्या स्मृतींना मुंबईत अभिवादन !


दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । मुंबई । संयुक्त  महाराष्ट्र  चळवळीचे  अध्वर्यू, महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, दै मराठा चे संपादक, साहित्यसम्राट आचार्य  प्रल्हाद  केशव  अत्रे  यांच्या ५३ व्या  स्मृतीदिनानिमित्त आज सकाळी १० वा आचार्य अत्रे समिती आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने वरळीनाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा सौ आरती पुरंदरे-सदावर्ते, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, समितीचे कार्याध्यक्ष विसुभाऊ बापट, उपाध्यक्ष आणि अत्रेसाहेबांचे नातू ऍडव्होकेट अक्षय पै, रवींद्र आवटी, अमर तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. समितीच्या वतीने शिवाजीपार्क गणेश उद्यान येथे आजपासून आचार्य अत्रे कट्टा सुरु करण्यात आला असून पहिले पुष्प गुंफण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे हे “संपादक आचार्य अत्रे” या विषयावर आपले विचार व्यक्त केले.  


Back to top button
Don`t copy text!