प्रा. डॉ. रोशनआरा शेख यांना Common Wealth Society for Innovation and Research यांचा Versatile Teacher of the Year हा पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील उपप्राचार्या व इंग्रजी विभाग प्रमुख  प्रा. डॉ. रोशनआरा शेख यांना Common Wealth Society for Innovation and Research Pune यांच्या तर्फे दिला जाणारा  Common Wealth Excellence Award – Versatile Teacher of the Year हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

पुणे कोरेगाव पार्क येथील हॉटेल ‘o’ या ठिकाणी आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मा. अध्यक्ष डॉ प्रशांत सिन्हा, समन्वयक डॉ. सुनील देवर्डे, डॉ. राकेश मित्तल डायरेक्टर मा.बिलाल शेख, एक्झिटीटयुव्ह डायरेक्टर डॉ. रिपू सिन्हा, PRO वैष्णवी झनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रसिद्ध  बॉलीवूड अभिनेत्री, अमिषा पटेल यांच्या हस्ते डॉ.शेख यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना Common Wealth Society for Innovation and Research Pune यांचे तर्फे सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रा. डॉ. रोशनआरा शेख यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालमध्ये 33 वर्षे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून अध्यापन करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच इंग्रजी विषयातील अनेक विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या अनुदानातून एक संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजनही त्या करतात.

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असून या तिन्ही भाषेत त्या उत्तम निवेदन करतात. तसेच सामाजिक कामातही त्यांचा सहभाग आहे. ‘महिला सबलीकरण’ या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली असून दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘बचत गट काळाची गरज’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी डॉ. रोशनआरा शेख यांना ज्ञानदायीनी पुरस्कार’, ‘राष्ट्रीय शिक्षक भुषण पुरस्कार’, उत्तम निवेदिका पुरस्कार मा. खासदार, श्रीनिवास पाटील फाउंडेशनचाआदिशक्ती साताऱ्याचीइत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा.डॉ. रोशनआरा शेख यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य मा. डॉ. विठ्ठल शिवणकर व उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. माने-देशमुख, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!