दैनिक स्थैर्य | दि. १५ मे २०२४ | फलटण |
श्रीमंत मालोजीराजे मुधोजीराजे नाईक निंबाळकर, राजेसाहेब, फलटण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दि. १४ मे २०२४ रोजी फलटण येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीमंत मालोजीराजे यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व मान्यवर उपस्थित होते.