दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । सातारा । मेवाड नरेश महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्रकाश इंदलकर, यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.