
दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुणवरे (ता.फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मेडिअम स्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी प्राचार्य संदीप किसवे यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक गिरीधर गावडे यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या आयुष्यातील विविध प्रसंग सांगून ते कशा प्रकारे भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले याचे विवेचन केले.
याप्रसंगी इयत्ता 1 ली ते 12 वी तील विद्यार्थ्यांनी भाषणे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कोरोना चे नियम पाळून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा दोशी यांनी केले तर आभार वसुंधरा भोईटे यांनी मानले.