मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

“प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राची पुरोगामी आणि सुधारणावादी प्रतिमा बळकट केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी म्हणून आणि मराठी संस्कृतीचे जतन यासाठी प्रबोधनकारांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील‌,’ असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!