दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२३ । मुंबई । छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (प्र. सु.र.व का. ) श्रीमती सुजाता सैनिक यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्रकाश इंदलकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कक्ष अधिकारी श्रीमती पल्लवी कदम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.