
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.३१: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
