
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । सातारा । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
