राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून राज्यपाल रमेश बैस यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२३ । मुंबई । राज्यपाल रमेश बैस यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचे दूरध्वनी करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील पत्राद्वारे राज्यपाल रमेश बैस यांचे अभिष्टचिंतन केले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दूरध्वनीवरुन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हरयाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, छत्तीसगडचे राज्यपाल विश्व भूषण हरिचंदन, मंत्री चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार, विविध विद्यापीठांचे कुलगुरु, रशियाचे प्रभारी वाणिज्यदूत तसेच लोकप्रतिनिधींनी राज्यपालांना फोन, पत्र तसेच समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!