
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि. 03 : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला संघर्षशील लोकनेता, दिलदार विरोधी पक्षनेता लाभला.
सत्तेत किंवा विरोधी पक्षात असताना त्यांनी नेहमी राज्याच्या हिताची भूमिका घेतली. आज महाराष्ट्र ‘कोरोना’संकटाशी लढत असताना त्यांची उणीव निश्चित भासत आहे. कष्टकरी, सामान्य जनतेसाठी मुंडे साहेबांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. संघर्षनायकाला विनम्र अभिवादन!
– अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
