आद्य समाजसुधारक, संत बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०२ मे २०२२ । मुंबई । आद्य समाजसुधारक, महान संत, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार अभिवादनपर संदेशात म्हणतात की, महात्मा बसवेश्वर क्रांतिकारी संत होते. आध्यात्मिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात वैचारिक सुधारणा, मूलभूत परिवर्तन घडवण्याचे क्रांतिकारी कार्य त्यांनी केले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट रुढी, जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद, कुळभेदाविरुद्ध लढा दिला. समतावादी, मानवतावादी विचारांचा पुरस्कार केला. महात्मा बसवेश्वरांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून, सोबत घेऊन पुढे जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत बसवेश्वरांबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!