दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । मुंबई । नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या सणांच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या सणांच्या माध्यमातून आपण निसर्ग, मानवी नातेसंबंध आणखी दृढ व्हावेत. त्यातून आपण सर्व समृद्धीकडे वाटचाल करूया,असा विश्वासही व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात,
समुद्राला जीवलगाप्रमाणे जीव लावणारे आपले कोळी बांधव “नारळी पौर्णिमा” सण उत्साहात साजरा करतात, ही एक निसर्गपूजाच आहे. त्यांचे समुद्राशी अतूट नाते आहे. तर रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याला आणखी दृढ करणारा, त्यामध्ये गोडवा वाढवणारा सण आहे. या दोन्ही सणांच्या माध्यमातून निसर्गाशी असलेले आपले नाते आणि मानवी नातेसंबंध दृढ व्हावेत. अशा क्षणांतून आपण एकमेकांशी असलेले प्रेम आणि विश्वासाचे नाते वृद्धींगत करूया, समृद्धीकडे वाटचाल करूया अशा मनापासून शुभेच्छा.’