दैनिक स्थैर्य । दि. १८ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.