
स्थैर्य, मुंबई, दि.२३: भारताचे स्वातंत्र्य सेनानी शहीद क्रांतिकारी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव आभा शुक्ला यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटीशांनी 23 मार्च रोजी फाशी दिली होती. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी. वळवी यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.