नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रती सरकार स्मारक स्थळावर अभिवादन


 

स्थैर्य, सातारा, दि. 9 : सातारा येथे रविवारी नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्राम विचार प्रेमींकडून प्रती सरकार स्मारक समितीच्या क्रांती दिन, प्रति सरकार स्मारक स्थळावर अभिवादन करण्यात आले. यावेळी इनकिलाब झिंदाबाद, क्रांती दिन चिरायू होवो घोषणा देण्यात आल्या.

सातारा येथे क्रांती दिन साजरा करण्यासाठी सातारचे प्रतिसरकार स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी डॉ. आतार, कॉम्रेड विजय निकम, स्वातंत्र्यसेनानी पतंगराव फाळके, असलम तडसरकर, इक्बाल मोमिन प्राध्यापक विक्रांत पवार, विलास कासार, मुक्तार सय्यद हे स्वातंत्र्य विचार प्रेमी मंडळी उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्र्यसेनानी फाळके म्हणाले, या ठिकाणी स्मारक होण्यासाठी  गेले दहा वर्षे आम्ही प्रयत्न करतोय. यंदा मात्र  करोनाचा काळ असल्यामुळे स्मारकासाठी निधीची मागणी करणार नाही. स्वातंत्र्यसंग्राम दिवशी आम्ही रोपवाटिकास सुरुवात करत आहे. स्वातंत्र्य संग्राम विचार प्रेमी युवकांनी येथे स्वातंत्र्य संग्राम विचार रोप लावावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!