
दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । सातारा । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.