
बारामती । 29 जुलै 2025 । बारामती । प्रत्येकाने बालपण, तरुणपण म्हातारपण या दरम्यानच्या काळात सामाजिक कार्याची आवड जोपासणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे केलेले सामाजिक काम कायमस्वरूपी आदर्शवत असते, असे प्रतिपादन बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.27 जुलै रोजी प्रभाग क्र 19 येथील गरजू नागरिकांना एसएस बॅग हाऊसच्या संचालिका अॅड अंजुमन सय्यद व पदाधिकारी यांच्यावतीने एक हजार नागरिकांना मोफत संसार उपयोगी वस्तू व स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले या वेळी किरण गुजर बोलत होते.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, बाळासाहेब जाधव, विजय खरात, राष्ट्रवादी युवक राज्य उपाध्यक्ष किशोर मासाळ, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अनिता गायकवाड व कासम कुरेशी, संजय वाघमारे, हरीश सातव,परवेज सय्यद, विशाल जाधव, फातिमा शेख, अभिजित बर्गे, डॉ आलिशा सय्यद व सानिया सय्यद आदी मान्यवर व प्रभाग 19 मधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभागतील रस्ता, लाईट, पाणी आदी समस्या सोडवण्यासाठी अॅड. अंजुमन सय्यद रोजगार उपलब्ध करून सामाजिक ओळख निर्माण केल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.
अॅड. अंजुमन सय्यद म्हणाल्या, पर्यावरण, स्वच्छता, सामाजिक कार्य व रोजगार निर्मिती करून मंत्री अजित पवार यांना अभिप्रेत असलेले कार्य याच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. संसार उपयोगी वस्तू आणि बॅग मिळाल्याने समाधानी व संतुष्ट असल्याचे नागरिकांनी सांगितले. श्री. सावळेपाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आलिशा सय्यद यांनी आभार मानले.