पत्रकार व साहित्यिकांचे समाजात मोठे योगदान

रवींद्र बेडकीहाळ; पत्रकार संघ परिसंवाद, पदग्रहण व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन


फलटण : रवींद्र बेडकीहाळ यांचा सत्कार करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर. त्यावेळी विक्रम सेन व मान्यवर.

स्थैर्य, फलटण, दि.11 नोव्हेंबर : पत्रकार व साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात समाजामध्ये यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे पत्रकार व साहित्यिक यांच्या विकासाकरिता शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत असे मत कार्यक्रमाचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी व्यक्त केले. येथील नवलबाई कार्यालयात पत्रकार संघ परिसंवाद, पदग्रहण व सत्कार समारंभ असे संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव, सचिन सूर्यवंशी (बेडके), प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रसाद जोशी, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, जेष्ठ नेते डी.के पवार, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एम एस शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मामा गणगे, सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख, सांगली जिल्हा संघटक अनंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, तरुण व युवा पत्रकारांनी शोध पत्रकारितेत काम करावे. पत्रकारितेत दिसत असले चित्र व त्यामागचे सत्य शोधण्याची गरज असते, पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे पत्रकार हा अनुभवी, अभ्यासू व दूरदृष्टी असलेला पाहिजे.

माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, रवींद्र बेडकीहाळ हे ज्येष्ठ पत्रकार असून अनेक वर्ष त्यांचे पत्रकारितेत काम आहे. त्यांनी ’दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले.

भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन म्हणाले, पत्रकारिता हे लोकहित व जनजागृतीचे कार्य आहे. हे कार्य करत असताना पत्रकारांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या कल्याणाकरिता काम करत असताना भारतीय पत्रकार संघाच्यावतीने देशाच्या अनेक वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांसोबत केलेले करार येत्या काळामध्ये पत्रकारांच्या हिताचे ठरत आहेत.

यावेळी जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांनी दर्पणकार पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर त्रिखंडात्मक ग्रंथ लिहिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. युवा पत्रकार विकास शिंदे सूत्रसंचालन केले. सिकंदर नदाफ यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!