
दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. ही ग्रंथदिंडीचे तालीम मैदान संघ ते श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथदिंडीमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांच्यासह विविध शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.