ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर


स्थैर्य, 28 फेब्रुवारी, सातारा : येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण आणि सुमन चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. यामध्ये नयन पहऱ्हाड यांच्या ‘जिवी जे गुंतले’ या अभंग संग्रहास आणि ऋषिकेश गोल्हार यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीस अनुक्रमे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रत्येकी दोन हजार ५०० रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे, अशी माहिती डॉ. अनिमिष चव्हाण यांनी दिली

याबरोबरच साताऱ्यातील वैशाली मंडपे यांच्या ‘सायबरनामा : आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता’ यास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांसाठी आलेल्यादर्जेदार साहित्याचे परीक्षण कल्पना चौधरी, नंदा जाधव आणि सुनीता कदम यांनी केले आहे. लवकरच साताऱ्यात एका सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल, असे डॉ. चव्हाण यांनी नमूद केले. या सोहळ्यात विविध विषयांवर लेखन करणाऱ्या सात साहित्यिकांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.यामध्ये साक्षी महामुलकर (प्राचीन सातारा), डॉ. शामला माने (ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे), राजेंद्र घाडगे (राजधुरंधर ताराराणी), अनिता आगाशे (लिंब आणि परिसर सांस्कृतिक परिचय), मनीषा शिरटावले (विसंवादाशी संवाद), अश्विनी कोठावळे (अंतर्नाद), काशिनाथ गायकवाड (महापुरुषांच्या वलयात) यांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!