महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । मुंबई । महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत दि. 31 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून परभणी जिल्ह्यातील कर्नल समीर बळवंत गुजर यांना मेन्शन इन डिस्पॅच हे पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 6 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

या महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतून अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही शासकीय अनुदानातून तर उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत दि. 3 जुलै 2000 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासकीय अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून रायगड जिल्ह्यातील कर्नल राघवेंद्र पृथ्वीराज सलगर यांना सेना पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 23 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!