
दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । सातारा । लंम्पी चर्म रोगामुळे मृत्यु झालेल्या 1 हजार 456 पशुधनास शासनाने 3 कोटी 77 लाख 89 हजार रुपये पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान वाटप करण्यात सातारा जिल्हा राज्यात प्रथम स्थानी असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.
लंम्पी चर्म रोगामुळे जिल्हयातील 20 हजार 422 जनावरांना लागन झाली होती. लंम्पी चर्म रोगामुळे जिल्हयात 1 हजार 489 पुशधनाचा मृत्यु झाला होता. त्यापैकी 1 हजार 456 पशुधनास शासनाने 3 कोटी 77 लाख 89 हजार रुपये पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.
लंम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजाराने जिल्हयातील 1 हजार 456 जनावरांचा मृत्यु झाला होता. खबरदारीच्या उपायोजनांमध्ये 100 टक्के म्हणजेच 3 लाख 47 हजार जनावरांचे लसीकरणही करण्यात आले होते. त्याचबरोबर लाळ खुरकुत या आजारापासून संरक्षण व्हावे म्हणूनही 5 लाख 57 हजार 200 जनावरांचेही लसीकरण करण्यात आले आहे.
शेतकरी हे शेतीबरोबर एक शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पशुपालन करत असतात. जिल्हयात 1 हजार 456 जनावरांचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान शासनाने 3 कोटी 77 लाख 89 हजार अनुदानाच्या स्वरुपात भरुन काढले. या अनुदानामुळे मृत्यु झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना नव्याने जनावरे खरेदी करण्यास मोठी मदत झाली आहे.