जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । सातारा । बालगृहातील  प्रवेशितांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचा उपक्रम स्तुत्य आहे. या बाल महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जी मुले-मुली यशस्वी होतील अशांना पुढे जाण्यासाठी योग्य प्रशिक्षकांसह सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले.

बालगृहातील प्रवेशितांसाठी 17 ते 19 जानेवारी 2023 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे  याचे क्रीडा ज्योत पेटवून पोलीस अधीक्षक श्री. शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास तहसिलदार राजेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, महिला व बाल विकास कार्यालयातील आतिष शिंदे, चेतन भारती, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुचित्रा घोगरे-काटकर, बाल न्याय मंडळाच्या स्मिता जामदार यांच्यासह सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

चाचा नेहरु बाल महोत्सावामुळे बालगृहातील प्रवेशितांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे, असे सांगून पोलीस अधीक्षक श्री. शेख म्हणाले, या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या मुला-मुलींना चांगले प्रशिक्षक, मैदान किंवा ज्या शाळेंमध्ये खेळांना वाव दिला जातो त्या शाळेत अशा मुला-मुलींचा प्रवेश करण्यात यावा.

बालगृहातील प्रवेशितांच्या विविध ठिकाणी सहली काढव्यात. चाचा नेहरु बाल महोत्सावात सर्व सेायी-सुविधा देण्यात आल्या आहेत. मुला-मुलींनी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत करुन  स्पर्धांमध्ये 100 टक्के योगदान देवून या स्पर्धांचा आनंद घ्यावा, असेही पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी यावेळी सांगितले.

श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रीडा संकुलामधून अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू तयार झाले आहेत. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

बालगृहातील प्रवेशितांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवामध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, 100, 200 व 400 मीटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रास्ताविकात जिल्हा व महिला बालविकास अधिकारी श्री. तावरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच बालगृहातील प्रवेशित मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!