दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या फलटण तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी ३८ अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकूण ११ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर सदस्यपदासाठी ६६ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, दर्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.
दरम्यान, तालुक्यातील पोटनिवडणूक असलेल्या ९ ग्रामपंचायतींच्या ११ प्रभागातील १२ सदस्यपदाच्या रिक्त जागांसाठी आज एकूण १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, गोळेवाडी, होळ, परहर बु. या तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक होत असलेल्या ३ सदस्यपदाच्या जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.
फलटण तालुयातील सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या चार ग्रामपंचायती व पोटनिवडणूक असलेल्या नऊ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.