गौप्यस्फोट : सरकारकडून येणाऱ्या 12 नावांना राज्यपाल देणार रेड सिग्नल; हसन मुश्रीफांचा खळबळजनक गौप्यस्फोट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२: महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त विविध क्षेत्रातील बारा आमदारांची निवड करण्यात येणार आहे. महाविकास आघाडितील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस पक्षांतर्गत चर्चेचे गुऱ्हाळ थांबवून बारा नावे निश्र्चित झाली आहेत. मात्र या नावांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रेड सिग्नल दाखवणार असल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच यासंदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात चर्चा झाल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी कोल्हापूरात केला.

मुश्रीफ म्हणाले, राज्याचे माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. याप्रसंगी आपले समर्थक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक भैय्या माने, भूविकास बॅंकेचे अध्यक्ष युवराज पाटील श्री कोरे यांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सांत्वन करण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची चर्चा सुरू झाली होती. यावेळी चर्चेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोरे यांना देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात चर्चा झाली आहे, महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी जी बारा नावे येतील ती बाजूला ठेवण्यात येणार आहेत असेही पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर भैय्या माने व युवराज पाटील यांनी मास्क घातला असल्याने चंद्रकांत पाटील यांना त्यांची ओळख पटली नाही. राज्य सरकारचे राज्यपालांनी ऐकावे अशी प्रथा आहे पण राज्यपालांचे कार्य असंविधानिक होत आहे असा आरोप करुन मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यपालांकर्वी राज्य चालवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे चाललेले हे राजकारण अत्यंत घातक आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाला खो घालण्याचे काम ते राज्यपालांच्या माध्यमातून करत आहेत. राज्य शासनाचे सर्व निर्णय आडवले जात आहेत असा गंभीर आरोपही मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!