राज्यपाल रमेश बैस यांनी दिली बेल एअर रुग्णालयास भेट


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२३ । सातारा । राज्यपाल रमेश बैस यांनी वाई, सातारा येथील रेड क्रॉस सोसायटीचे बेल एअर सुपर स्पेशालिटी रुग्णालयास भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, फादर टॉमी, व्यवस्थापक जितीन जोश, डॉ. सुनील पिसे, डॉ. सिजो जॉन, डॉ. मंगला अहीवळे, डॉ. नरेंद्र तावडे, डॉ. शयाल पावसकर, डॉ. रेश्मा नदाफ यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री बैस यांनी रुग्णालयातील विभागांची सविस्तर माहिती घेऊन शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, ल‌ॅबोरेट्री, सिटीस्कॅन, एक्सरे, जनरल वॉर्ड या विभागांना भेट देऊन पाहणी केली.

यावेळी फादर टॉमी यांनी रुणालयाच्या कामकाजाची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!