दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । बारामती । सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनियर कॉलेज या शाळेतील स्काऊट गाईड पथकातील स्वामी विवेकानंद पथकाने सन 2018-19 साली 20 विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाणाऱ्या राष्ट्रीय पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले याची दखल घेत राष्ट्रीय कार्यालयाने 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा कार्यालयामार्फत पंतप्रधान ढाल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र सोबत पाठवून शाळेचे अभिनंदन केले होते.
पंतप्रधान ढाल स्पर्धेत क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळेला व विद्यार्थ्यांना राज्यपाल यांच्या शुभहस्ते पंतप्रधान ढाल सुपूर्त करण्याची परंपरा आहे. परंतु कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम झाला नव्हता. परंतु सदर कार्यक्रम हा शनिवार दि.16 एप्रिल 2022 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2021या आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार देण्यात आला.
शाळेतील स्काऊट प्रतिनिधी नंदलाल तिवारी (इयत्ता 10वी ) व गाईड प्रतिनिधी अदिती चव्हाण (इयत्ता 9वी ) या दोन विद्यार्थ्यांनी हा सन्मान मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्वीकारला.
तसेच अशी कामगिरी सन 2019 करणारी ग्रामीण। भागातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याने संस्थेचे प्रमुख सागर आटोळे तसेच संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला या वेळी शासनाचे विविध विभागाचे प्रतिनिधी व राजभवन मधील अधिकारी व यावेळी सागा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री सागर धापटे , राजमाता कल्पनाराजे भोसले, ॲड गुलाबराव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.