प्रेरणास्थळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची स्वातंत्र्य सैनिक स्व.जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली


दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज 25 नोव्हेंबर रोजी प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्य सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार किर्ती गांधी व यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रसिद्ध पंजाबी गायिका हरगुण कौर, गायक प्रशमेश लघाटे, स्थानिक कलावंत व वाय.पी.एस.स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्व.जवाहरलाल दर्डा यांना भजन व भक्तिगीतातून आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमानंतर राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी प्रेरणास्थळ परिसरात वृक्षारोपण केले व नोंदवहीत अभिप्राय नोंदविला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर,विद्यार्थी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!