स्थैर्य, कातरखटाव, दि. 07 : महाराष्ट्र शासनाने शेतकर्याकडील हरभरा पिक ४ हजार ८०० या हमीभावाने खरेदी करावे अशी मागणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
याबाबत अधिक माहिती अशी: शासनाने हरभर्याचा ४ हजार ८०० हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सद्या घावूक बाजारात हरभर्याची खरेदी, विक्री चार हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी शेतकर्याकडून ३५०० ते ३८०० रुपये दराने शेतकर्याकडून माल खरेदी करत आहेत. कोरोनोमुळे आदीच संपुर्ण मार्केट ठप्प झाले आहे. भाजीपाला पिकाला बाजारपेठ मिळत नाही. खते, बी-बियाणे यांचे वाढीव दर यामुळे अगोदर शेतकर्याचे कंबरडे मोडले आहे. तर हरभर्यासारख्या पिकाला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अश्या परस्थितीत शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी पनन महामंडळ, मार्केटींग फेडरेशन, खरेदी-विक्री संघ या माध्यमातून हमीभावाने हरभरा पिकाची खरेदी करावी.
यावेळी कोरोना संसर्गजन्य आजारामुळे शेतकर्यांची झालेली हालाकीची स्थिती व त्यावर उपाय योजना या संदर्भात साधक-बाधक चर्चा झाली. तर कोरोना काळात नगरसेवक अनिल माळी, आयाज मुल्ला यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा घार्गे व नगराध्यक्ष गोडसे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वडूजचे नगराध्यक्ष सुनिल गोडसे, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पवार, मजूर फेडरेशनचे संचालक सचिनशेठ माळी, राजेंद्र चव्हाण, अनिल माळी, जयवंत पाटील, संजय काळे, परेश जाधव, संतोष गोडसे, संदिप गोडसे, निलेश कर्पे, अमोल वाघमारे, श्रीकांत राऊत, अॅड. प्रशांत पाटील, विजय जगदाळे, बाळासाहेब दबडे, के. ए. शिंदे, सोमनाथ साठे, विजय शेटे, नितीन माळी, शिवाजी पवार, वैभव इनामदार, संभाजी शेटे, नामदेव शेटे, योगेश राऊत, विशाल जगदाळे, राजेंद्र दाभाडे, सचिन साठे, श्री. डांगे आदी उपस्थित होते. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. नितीन जगदाळे, नितीन राऊत यांनी सुत्रसंचालन केले. आयाज मुल्ला यांनी आभार मानले.