स्थैर्य, सातारा, दि. 07 : महाराष्ट्र शासनाने शेतकर्याकडील हरभरा पिक 4 हजार 800 या हमीभावाने खरेदी करावे अशी मागणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी बोलताना केली.
याबाबतची अधिक माहिती अशी, शासनाने हरभर्याचा 4 हजार 800 हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सद्या घावूक बाजारात हरभर्याची खरेदी, विक्री 4 हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी शेतकर्याकडून 3,500 ते 3,800 रुपये दराने शेतकर्याकडून माल खरेदी करत आहेत. कोरोनोमुळे आदीच संपुर्ण मार्केट ठप्प झाले आहे. भाजीपाला पिकाला बाजारपेठ मिळत नाही. खते, बी-बियाणे यांचे वाढीव दर यामुळे अगोदर शेतकर्याचे कंबरडे मोडले आहे. तर हरभर्यासारख्या पिकाला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अश्या परस्थितीत शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी पनन महामंडळ, मार्केटींग फेडरेशन, खरेदी-विक्री संघ या माध्यमातून हमीभावाने हरभरा पिकाची खरेदी करावी.
यावेळी कोरोना संसर्गजन्य आजारामुळे शेतकर्यांची झालेली हालाकीची स्थिती व त्यावर उपाय योजना या संदर्भात साधक-बाधक चर्चा झाली. तर कोरोना काळात नगरसेवक अनिल माळी, आयाज मुल्ला यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल घार्गे व नगराध्यक्ष गोडसे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.