दैनिक स्थैर्य | दि. २९ नोव्हेंबर २०२३ | मुंबई |
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता सईबाई यांच्या स्मृतीस्थळाच्या विकास आराखड्यास शासनाच्या नियोजन विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने विकास आराखड्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यास नियोजन विभागाकडून मान्यता देण्यात आली असून २९.७३ कोटींचा निधी आज मंजूर केला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला आहे.
फलटण राजघराण्यातील असलेल्या राजमाता सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी व छत्रपती संभाजीराजेंच्या आई होत्या. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता सईबाई यांच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी विश्वस्त संस्थेकडून पुणे जिल्हाधिकार्यांकडे मागणी करण्यात आली होती.
या विकास आराखड्यांतर्गत कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांची ‘संनियंत्रण अधिकारी’ म्हणून नियुती केली आहे.
राजमाता सईबाई स्मृतीस्थळ विकास आराखडा पुढीलप्रमाणे :
पुरातत्व विभागाकडील कामांचा तपशील (रू. २९.७३ कोटी)
अ. क्र. तपशील रकम रू. लक्ष
अ)
१ उर्वरित ठिकाणी पुनउत्खनन करणे ४०.००
२ उत्खननात प्राप्त अवशेषांचे जतन/दुरूस्ती करणे. १००.००
३ सदरहू अवशेष पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी वाडासदृश छत्र निर्माण करणे. ३००.००
४ वाड्याच्या तटबंदीची दुरूस्ती/पुनर्बांधणी करणे. ६५०.००
५ लँडस्केपींग करणे १५०.००
६ वाड्याच्चा प्रतिकृती तयार करणे ३००.००
७ डिजिटल संग्रहालय निर्माण करणे ३२५.००
८ पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा १००.००
९ विद्युतीकरण/ प्रकाश व्यवस्था १८०.००
एकूण २१४५.००
ब)
१० जीएसटी १८% ३८६.००
११ आर्किटेट ३% ६४.३५
१२ भाववाढ १०% २१४.५
१३ रॉयल्टी इन्शुरन्स व इतर खर्च २% ४२.०९
१४ भूसंपादन १२०.६५
एकूण ब ८२८.४०
एकूण अ+ब २९७३.४०