केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट


दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । फलटण । माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी कराड दांपत्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत पश्‍चिम महाराष्ट्रात केंद्रीय पातळीवरुन नवीन उद्योग कशा पद्धतीने आणता येतील व यासाठी वरिष्ठ पातळीवरून कशी मदत करता येईल यावर चर्चा झाली. जे साखर कारखाने, सुतगिरणी, दुग्धव्यवसाय, बँका, अडचणीत आहेत त्यांना बँकांकडून कशी मदत करता येईल. यासाठी ना.कराड यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील अडचणीत असलेल्या उद्योगांची एकत्रित बैठक लवकरच पश्‍चिम महाराष्ट्रात लावावी अशी सुचना करुन व आपल्याकडून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.


Back to top button
Don`t copy text!