स्थैर्य, फलटण दि.०९ : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यान्वित असलेल्या कोरोना विलगीकरण केंद्रांना भेटी देवून त्या ठिकाणच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपचार घेणार्या रुग्णांशी संवाद साधून रुग्णांना देण्यात येणार्या सुविधांबाबत श्रीमंत संजीवराजे यांनी समाधान व्यक्त केले.
बरड, राजुरी, विडणी, पिंपरद, निंबळक, पवारवाडी, गोखळी या ठिकाणी कार्यान्वित असलेल्या विलगीकरण कक्षांना श्रीमंत संजीवराजे यांनी दिलेल्या भेटीदरम्यान त्यांच्या समवेत आमदार दीपक चव्हाण, फलटण पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे आदींची उपस्थिती होती.
सदर भेटी दरम्यान श्रीमंत संजीवराजे यांनी सदर कोरोना विलगीकरण केंद्राची रोजची व्यवस्था बघणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून सविस्तर माहिती घेतली व आवश्यक त्या सूचनाही केल्या.