गोखळी कोरोना विलगीकरण कक्षास आमदार निलेश लंके यांची सदीच्छा भेट


स्थैर्य, गोखळी दि.०३: पोषक वातावरणात करण्यात आलेली गोखळी येथील कोरोना विलगीकरण कक्षाची उभारणी कोरोना बाधितांना कोरोना मुक्तीसाठी उपयुक्त असल्याचे मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

फलटण तालुक्याच्या दौर्‍यावर असताना आ.निलेश लंके यांनी पूर्व भागातील गोखळी येथील कोरोना विलगीकरण कक्षास भेट दिली. यावेळी आयुर उद्योग समूहाचे प्रमुख दिगंबर आगवणे उपस्थित होते.

आ.लंके यांनी कोरोना विलगीकरण कक्षात थेट प्रवेश करून कोरोना बाधीत रुग्णांची भेट घेतली. यावेळी सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी करून रुग्णांना आधार धीर दिला. कक्षातील रूग्णांना देण्यात येणार्‍या सुविधा बद्दल चौकशी करून कोणतेही अनुदान न घेता लोकसहभागातून चालविलेल्या कामाबद्दल गोखळी करांचे आ.लंके यांनी अभिनंदन केले.

यावेळी आमदार निलेश लंके यांचे हस्ते विलगीकरण कक्षातील कोरोना मुक्त रुग्णांना झाडं देऊन निरोप देण्यात आला.

कोरोना विलगीकरण कक्षाबदल सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी माहिती दिली. गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांनी झाडं देऊन आ.निलेश लंके यांचे स्वागत केले. विलगिकरण कक्षातील रूग्णांना दररोज चहा नाष्टा देणारे दीपक चव्हाण यांचा झाडं देऊन निलेश लंके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील, पोलिस पाटील विकास शिंदे, उपसरपंच डॉ. अमित गावडे, रमेश गावडे, सुनील बापू मदने, हनुमान दहिहंडी संघाचे अध्यक्ष योगेश भागवत, माजी उपसरपंच ज्ञानदेव घाडगे, अभि जगताप, राजेंद्र भागवत, शेखर लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!