
इंग्रजाने १५० वरीस राज्य केलं. पाऊणशे वरीस स्वातंत्र्य मिळून सुद्धा इंग्रजळपणा वृत्तीतून जाईन.इंग्रजी भाषा आवश्यक आहे.पण मायबोली ला प्राधान्याने अग्रक्रम हवा.त्यांच्या सुधारणा,कायदे यातून आपण बोध घेणे दुरुच अन् नको ते डे साजरे करण्यात स्वारस्य दिसून येते.
आपल्या भारतीय संस्कृतीला हजारो वर्षाची परंपरा आहे.जगाने त्याचा स्विकार केला.आपण पाश्चिमात्य संस्कृती अडकून पडलो आहे.
गुलाब (व्हॕलेंटाईन डे) या दिवशी म्हणे तरुण तरुणीने एकमेकांना गुलाब पुष्प देऊन मनातल्या भावभावना(चांगल्या )यांची अदानप्रदान करावे.यातून मूळ हेतू बाजूला जाऊन आज तरुणाई भरकटत आहे.गुलाब देऊन आपण आपल्या कोणत्या भावभावना व्यक्त करणार हा प्रश्नच आहे.त्यापरीस युवक युवतीने फुलांचा राजा गुलाब याकडून हे शिकावे की,गुलाबासारखा रुबाब मिरवण्यासाठी काटेरुपी संघर्ष पूर्ण वाटचाल करुन ध्येय गाठावे.
गुलाब पुष्प आई बाबा,गुरुजन,ज्येष्ठ ,समाजिक भान असणारा जनसमुदाय यांना दिल्यास जगण्याची उर्मी वाढीस लागेल .पाश्चात्त्य पद्धतीने गुलाब तरुण तरुणीने घेण्यास नकार दिल्यास अपमानित अथवा वैफल्यग्रस्त होण्यापरीस आपल्या भावभावनांना कार्याद्वारे न्याय द्यावा .
ख-या अर्थाने १४ फेब्रुवारी मातृ पितृ दिन साजरा करुन,त्यांच्या हाताने यशस्वी झाल्यावर गुलाब पुष्प स्विकारावे.त्यांचे संस्कार ,कष्ट,तळमळ याची जाणिव ठेवणे.उगाच कोणत्याही डे च्या फंद्यात पडून दिवस वाया घालवण्या परीस प्रत्येक दिवस आई वडीलांच्या जाणिवेचा विसर न पडू देता,उत्कर्ष साधणे हाच खरा गुलाब दिवस होय.
तरुणाईचे कर्तृत्व हेच गुलाब दातृत्व
आपलाच दिनू प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१