समाज व समाजमान्य गोष्टी करणे योग्य की अयोग्य ही वादातीत बाब आहे.समाज हा अनेक चाली रिती रुढी परंपरा संस्कार आचार विचार या मुशीतून घडत असतो.तो सतत गतीशील व परिवर्तनशील आहे.सामाजिक न्याय याचा अर्थ समाजस्वास्थ्य बिघडले असे वर्तन नसावे.आणि सर्वात महत्त्वाचे फार बंधनकारक ही नसावे.समाज मान्य व अमान्य काय?या विचार भोव-यात आडकल्यास प्रगतीच्या चाकांना गती येण्यापरीस अधोगतीची उटी लागेल.
कन्या विवाह कधी करावा?नोकरी केल्यास संसाराच काय?नव-यापेक्षा पगारच जादा?अपत्य…नटणे…मुरडणे..यातून समाज काय म्हणेल.समाज हा जसं समजेल व त्याला रुचेल असेच वागणार व बोलत राहणार.
मुलांच्या बाबतीत आई बापाच्या जीवावर मिजास,चैनखोर,उनाड,अभ्यासी किडा,तुझ्याच्याने काय दिवे लागणार.अश्या टिमक्या समाजमनातून उमटतात.
चांगले करणाऱ्या वृत्तीला पायबंद घालणार .समाज हा आपआपल्या परीने कार्य करीत असतो.सध्या कुणाच कुणाला काही देणं घेणं पडल नाही.वाजल की कानोसा घेणार समाज मनं असते.तसे चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट म्हणारे समाज मनं आहे.सामाजिक न्याय दिनी ए पामराची एवढीच अपेक्षा की,” आपल्या वागण्या बोलण्याने समाज मनं दुखवणार नाही अथवा तुटणार नाही याची काळजी घ्यावी.समाजाने ही उदात्त भावनेने आपले व परके न मानता योग्य न्याय निवाडा केल्यास सामाजिक संतुलन राहणार.मी मोठा नव्हे तर आपला समाज मोठा हे तत्त्व पाळल्यास अडचण येणार नाही.समाज म्हणजे जात व धर्म नव्हे .तर अखंड मानवी जीवन सुखकर ही विश्वव्यापी संकल्पना.
समज आली की सामाजिक भान आलेच
आपलाच सर्वसामावेशक प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१