गुड थॉट्स : सुप्रभात…..आज १८ फेब्रुवारी… वैचारिक श्रीमंती लाभावी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


काळाबरोबर माणसं बदलली पण विचार बदलले का?विज्ञान व तंत्रज्ञान यांनी नवनविन शोध लावले.माणसं चंद्रावर ,सागराच्या तळाशी, यानाने अवकाश भ्रमण, प्रसार मध्यामाने बसल्या जागेवर माहिती ,भ्रमणध्वनीने दूरचा जवळ या अभासी दुनियेत मानवी जीवन गुरफूटून गेलं.बदल भौतिक साधनांत झाला.पण मानवी प्रवृत्ती तश्याच नव्हे पहिल्यापेक्षा जास्त वाढीस लागल्या.

गगनचुंबी इमले तयार झाले,परदेश गमन सहज,दळणवळणाच्या सुलभ सोई,जग हाकेच्या अंतरावर ही उत्क्रांती घडून आली.पण मानवी मनाचा कोतेपणा,वैचारिक खुजेपणा,द्वेष ,मत्सर याने जागतिक वातावरण दुषीत होऊन आपण भावी पिढीला वसा अन् वारसा काय देणार?

वैचारिक अधिष्ठान प्राप्त करण्यासाठी भ्रमंती,निसर्गाने दिलेल्या ऊन वारा पाऊस या लिलांचा अनुभव घेणे.द-या डोंगर नदी यांची हितगुज करणे.चांगल्या विचारात व पुस्तकात रमल्यास वैचारिक अधपतन नक्कीच कमी होईल.निराशेचे मळभ दाटून आले असले तर उजेडाचे कवडसे आपआपल्या परीने कार्यरत आहेत.आपण फक्त त्यात खोडा न घालता शांत राहिल्यास वैचारिक पहाटेचे दान लाभणार.

विचार बदला जीवन घडवा

आपलाच विचारांचा काजवा प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!