गुड न्यूज : अनुष्का-विराटनंतर आता सागरिका-झहीरकडे गोड बातमी, लवकरच होणार चिमुकल्याचे आगमन!


 

स्थैर्य, दि.१२: एंटरटेन्मेंट आणि क्रिकेट विश्वातून आता आणखी एक गोड बातमी आली आहे. अलीकडेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले होते. आता यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरीदेखील पाळणा हलणार आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, सागरिका गर्भवती असून लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे. सध्या हे दोघेही यूएईमध्ये आहेत. झहीर सध्या मुंबई इंडियन्स संघाचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स म्हणून काम करतोय. येथेच सागरिकाने झहीरचा अलीकडेच वाढदिवस साजरा केला होता. या रिपोर्टनुसार, झहीरच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सागरिकाने ब्लॅक कलरचा लूज ड्रेस परिधान केला होता, ज्यात तिचे बेबी बंप स्पष्ट दिसले. झहीर खान आणि सागरिका यांच्या मित्रांनी या गुड न्यूजला दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप या दोघांनी याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

सागरिका आणि झहीर यांनी 24 एप्रिल 2017 रोजी साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते.

राजघराण्यातून आहे सागरिका

सागरिकाचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कोल्हापूर येथे झाला. विशेष म्हणजे सागरिका घाटगे ही राजघराण्यातील सदस्य आहे. सागरिकाची आजी ह्या इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या आहेत.

रजिस्टर पद्धतीने केले होते सागरिका-झहीरने लग्न

तीन वर्षांपूर्वी सागरिका आणि झहीर यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले आणि सर्व नातेवाईक-मित्रांसाठी विविध पार्टीचे आयोजन केले. लग्नानंतर मुंबईतील ‘द ताज महल पॅलेस’ येथे थाटामाटत त्यांचे रिसेप्शन झाले. यावेळी बॉलिवूड तसेच क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!