सुप्रभात…..आज २ जुलै चांगल्या कर्माचे फल टनाने देतं ते फलटण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । फलटण ।  आषाढ शुद्ध तृतीया  तिथीनुसार माऊली वाढीव मुक्काम फलटणकरांची पर्वणीच. वरुणराजेची हजेरी , आखाडी अल्हाददायी वारे , हिरवाईनं नटलेली धरतीमाता ,  भाटघर , वीर , देवघर धरणाचा  निरा उजवा कालवा भरुन वाहतोय. महाराष्ट्र कुलस्वामिनी भिवाईमाता , कुलदैवत उजैनराजा धुळदेव यांचे दर्शन .

स्वराज्य रक्षक शंभूराजे यांचे आजोळ , महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सासुरवाडी , प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची वक्तृत्व वैखरी पंढरी अश्या फलटणनगरीत वारकरी दंग होऊन जातात.  प्रभू श्रीराम , हरिबुवा ,  आबासाहेब ,उपळेकर महाराज , चक्रधर स्वामी मठ , जैन काशी , संस्थान भव्य दिव्य राजवाडा , ऐतिहासिक रामरथ यात्रा. अश्या फलटण नगरीत आनंदाचे तरंग बहरतात.

वारेच्या वाटेवरील पहिले लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन. दरमाह कीर्तन  , प्रवचन  , महाप्रसाद यांची वारकरी भवनांतून सेवा अखंडित सुरु असते. छत्रपती शिवाजी वाचनालय दीडशे वर्षापूर्वीचा वाचन संस्कार ठेवा आबादित आहे. माऊली सोहळा अर्ध्या टप्प्यावर विराजमन. माऊली राम कृष्ण हरी.

आपलाच शब्दवारकरी प्रा. रवींद्र कोकरे
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!