सुप्रभात….आज ६ जुलै वेळोवेळी भगवंताची आठवण मंजे वेळापूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । फलटण ।  क्षणभर सुद्धा वेळ वाया न  घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान जिथं होते ते वेळापूर. वेळ न दवडता भगवंत चरणी लीन , दीन होऊन विनवणी , तारुण्यातच वारी करावी. माळशिरस मुक्काम आटोपून माऊली मार्गस्थ होते.

खुडूस फाटा येथे माऊली वारीतील भव्य दिव्य सर्जनात्मक दुसरे गोल रिंगण सोहळा संपन्न होतो.  विंझोरी , ज्ञानेश्वरनगर , धावाबावी माउंट अशी हरिजागर करीत वाटचाल सुरु होऊन वेळेतच वेळापूरी विसावते.

आयुष्यात वेळेला महत्त्व द्यावे. अध्यात्म , संस्कृती , भक्ती , प्रपंच  , संतान , संस्कार , मातापिता , नातीगोती वेळच्या वेळी पाहणे. हेच वेळापूर माऊली.

आपलाच विठ्ठलमय प्रा. रवींद्र कोकरे.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!