सुप्रभात…….आज ३० जून पहिले ऊभे रिंगण सोहळा चांदोबा लिंब  तरडगांवी


दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । फलटण । आषाढ शुद्ध प्रतिपदा , महाकवी कालिदास दिन , गुरुपुष्यामृत शुभदिनी लोणंदकरांचा अडीच दिवसाचा मुक्काम उरकून दुपारी पालखी तळावरुन माऊलीच्या जयघोषात सोहळा तरडगांवी मार्गस्थ होत आहे. वारीच्या वाटेवरील अवघ्या ७ किलोमीटरचा टप्पा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. सर्व भाविक भक्त , वारकरी यांचे लक्ष वारीतील पहिले ऊभे  रिंगण अनुभवन्यास वेधले जाते.

पुरातन चांदोबाचा लिंब या पटागंणावर सकाळपासूनच भाविकांची रिघ लागलेली असते. पालखीरथा बरोबरच्या सर्व मानाच्या दिंड्या दुतर्फा टाळ ,मुदृगं ,वीणा ,पताका ,तुळशी  घेऊन नामस्मरण करीत असतात. रिंगण सोहळ्यातून वारक-यांना ऊर्जा मिळते.

माऊली रथापासून चोपदार विराजमन अश्व अन् दुसरा माऊली सदृश्य अश्व यांच्या फे-या व माऊली समोर बेफाम अश्वदौड हा नयनमनोहरी सोहळा लाखो वारक-यांचा श्वास आहे. अश्वाच्या टप्पाखालची माती माथा लाऊन माऊली जयघोषाने पुरातन चांदोबाचा लिंब येथील पहिले ऊभे रिंगण सोहळा आटोपून तरडग्रामी विराजमन.

युवा पिढीने  पुरातन चांदोबा लिंब , रिंगण यावर संशोधन करुन  हा ऐतिहासिक वारसा संवर्धन करावा. वारीच तंत्र ,मंत्र जपावे. तूर्तास राम कृष्ण हरि माऊली.

आपलाच रिंगणी प्रा. रवींद्र कोकरे.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!