दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । फलटण । जेजुरी मुक्काम उरकून दौंडजचा विसावा अन् भर दुपारी माऊली वाल्हेग्रामी येते. दारात सडा , रांगोळी , तोरण , गुढी उभारुन गावकरी भाजी भाकरीचा अस्सल गावरान मेवा वारक-यांच्या सेवेशी.
वाल्हे मंजे भर तारुण्यात माणसाने कोमाल , प्रेमळ , जिव्हाळासंपन्न होणे असा भावार्थ आहे. आद्य रामायणकार वाल्मिकी यांची समाधी आहे. राम नामाने वाल्ह्याचा वाल्मिकी होणे . आपल्या जीवनात सुद्धा आपलेच कर्म आपणांस भोगावे लागते. त्यातून कोणाचीही सुटका होत नाही. आपले कर्म चांगले असावे.फलित इष्टच मिळणार. वाल्हेग्रामी गावकरी खांद्यावर पालखी घेऊन ग्रामप्रदक्षिणा घालताना. माऊली जयघोषाने पंचक्रोशी दुमदुमून जाते.
आपलाच वल्हेकरी प्रा. रवींद्र कोकरे
९४२१२१६८२१