सुप्रभात…..पुणं तिथं काय उणं


दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । फलटण । ज्ञानोबा तुकोबाचा हरिगजर , कपाळी गंध , पाचीपक्कवानाची शाही मिष्टान्न पंगती , वारक-यांची मनोभावे सेवा यात पुणेकर खरंच कमी पडत नाहीत. आदरतिथ्य करण्यात तूसभर खंड न पडता सेवा सुरुच असते. माऊली माऊली याचा सतत गजर. ऊन सावलीचा व मधूनच ज्येष्ठ मृगाचा शिडकावा. हरिपाठ , गवळणी , किर्तन , प्रवचन , भारुड यांचे उत्कृष्ट सादरीकरण.

पुण्यात अध्ययनासाठी येणाऱ्या युवापिढीसाठी पुण्यातील पालखी मुक्काम बरंच शिकवून जातो. जातपत , मी पणा , उच्च निचता यापरीस लिनता, नम्रता यांची ओळखा होते. अक्षर ओळख नसलेले निष्ठावन वारकरी ज्ञानेश्वरीतील ओव्या व गाथेतेली अभंग गातात. तवा कळतं एकाग्रता व निष्ठा यांचे फलित काय. अध्ययन व अध्यापन याचा आर्दश पुण्यातील पालखी सोहळा शिकवतो.

युवकांनी विपूल संशोधन करुन वारीवर विद्यावाचस्पती पदवी संपादन करावी. श्रवण करावे.पुण्यातील पालखी विसावा सेवेशी सदैव या भावनेतून वारकरी सुखावतात. पहिल्या टप्प्यावरील शिणवाटा कुठल्या कुठं निघून जातो. हे कळतच नाही. औद्योगिक , सांस्कृतिक , ऐतिहासिक पुण्यनगरीत शनिवार वाडा , लाल महल , क्रांतीजोती सावित्रीबाई फुले विद्यापीठ , कृषि महाविद्यालये बरंच पाहता येतं. अनुभवता येतं. पहाटेच्या पारी पुढील टप्यावर माऊली सोहळा मार्गस्थ होतो.

आपलाच हरिहर प्रा. रवींद्र कोकरे
९४ २१ २१ ६८ २१


Back to top button
Don`t copy text!