
दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२२ । मुंबई । यावर्षी जागतिक बाजारांत अनेक अनिश्चित घटना होऊनही, सोने हा घटक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओसाठी अनुकूल ठरला नाही. रशिया-युक्रेन युद्ध, जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे वाढवण्यात आलेले व्याजदर, वाढती महागाई आदी घटकांच्या पार्श्वभूमीवर २०२२ सालात सोन्याचे दर थंड राहिले.
मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याचे भाव सुमारे २ टक्क्यांनी घसरले आहेत, तर रुपयाचे सुमारे ११.५ टक्क्यांनी अवमूल्यन झाल्यामुळे एमसीएक्स सोन्याचे दर सुमारे १३ टक्क्यांनी वाढले. सोन्याच्या किमतींमागे अनेक घटक कारणीभूत होते आणि एक असेट वर्ग म्हणून तसेच पोर्टफोलिओला वैविध्य देण्यारा अंगभूत घटक म्हणून सोन्याची गुणवत्ता धोक्यात होती, हे सोन्याच्या किमतींमधील चढउतारांतून स्पष्टपणे दिसून येते. या चढउताराला नेमके कोणते घटक कारणीभूत ठरले याचे विश्लेषण एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी येथे केले आहे.
मध्यवर्ती बँकांची कडक वित्तीय धोरणे- सोन्याचे दर वाढण्यातील अडसर: चलनवाढीचा दर त्यांच्या मध्यवर्ती बँकेच्या २ टक्के एवढ्या उद्दिष्टाहून बहुतांशी खाली राहिला, तर भारतात मात्र चलनवाढीचा (महागाई) दर अनेकदा ४-६ टक्के या उद्दिष्टकक्षेच्या वर गेला. त्यामुळे भारतातील महागाईचा दर ४ टक्के सरासरीहून चढा राहिला. २०२२ मध्ये चलनवाढीतील चढउतारांमुळे यूएस फेडरल रिझर्व्हसाठी वित्तीय धोरण कडक करणे अधिक महत्त्वाचे झाले आणि त्याची परिणती म्हणून अमेरिकेत तीव्र दरवाढ झाली आणि हा संबंध २०२२ मध्ये व्यस्त झाला. जागतिक बाजारांमध्ये चलनवाढ हा चिंतेचा विषय असल्यामुळे मध्यवर्ती बँकांनी जागतिक वित्तीय धोरणे कडक करणे हे डॉलरच्या निकषात सोन्याची कामगिरी कमी राहण्यामागील प्रमुख कारण ठरले. प्रमुख अर्थव्यवस्थांमधील चलनवाढीचा प्रवास कसा राहिला हे खालील निर्देशांकातून एका दृष्टिक्षेपात स्पष्ट होईल.
ईटीएफमधील बाहेर जाणारा ओघ आणि मध्यवर्ती बँकांद्वारे सोन्याच्या साठ्याचा संचय: सोन्याच्या मागणीमध्ये अलंकारांना असलेली मागणी, मध्यवर्ती बँकांची मागणी, ईटीएफ, बार व नाणी तसेच तंत्रज्ञानातील मागणी हे घटक समाविष्ट असतात.
मध्यवर्ती बँकांनी २०२२ मध्ये सोन्याचा साठा वाढवला: केंद्रीय बँका दरवर्षी सोन्याच्या साठ्यात वाढ करत असतात आणि २०२२ सालही याला अपवाद नव्हते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या आकडेवारीनुसार, जागतिक मध्यवर्ती बँकांच्या खरेद्यांमध्ये २०२२च्या तिसऱ्या तिमाहीत सुमारे ४००टी वाढ झाली (क्यूओक्यू तत्त्वावर ११५ टक्के वाढ). २००० सालापासून या क्षेत्रात झालेली ही एका तिमाहीतील सर्वांत मोठी वाढ आहे आणि २०१८च्या तिसऱ्या तिमाहीतील २४१ टी या विक्रमाच्या तुलनेत ही वाढ सुमारे दुप्पट होती. निव्वळ खरेदीतील वाढीची ही सलग आठवी तिमाही होती आणि मागील वर्षाच्या म्हणजेच १ नोव्हेंबर २०२२च्या तुलनेत वाढ होऊन ही खरेदी ६७३ टी झाली, १९६७ सालापासूनचा हा संपूर्ण वर्षातील खरेदीचा विक्रम आहे.
ईटीएफच्या क्षेत्राचा विचार करता, जागतिक गोल्ड ईटीफ्समध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये सलग सातव्या महिन्यातील निव्वळ आउटफ्लोची नोंद झाली. मागील वर्षाच्या तुलनेत नोव्हेंबर २०२२ मध्ये, जागतिक गोल्ड ईटीएफ आता निव्वळ आउटफ्लोंच्या ८३ टी (२.४ अब्ज डॉलर) झाले होते. यामागे प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील व आशियातील सूचित फंडांचा वाटा होता.
२०२२ मधील बार व नाणी तसेच अलंकारांना असलेली मागणी: कोविड साथीमुळे दबून राहिलेल्या मागणीची परिणती म्हणून २०२२ सालाच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये अलंकार तसेच बार व नाण्यांच्या खरेदीत स्थिर वाढ झाली. २०२१ सालातील याच कालखंडांशी तुलना करून तयार केलेल्या वरील डेटा संचांमधून हे दिसून येते.
याशिवाय, मध्यवर्ती बँकांच्या वाढत्या खरेदीमुळे (अहवालात यावर पूर्वी चर्चा झाली आहे) आणि २०२२ सालाच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये अलंकारांच्या मागणीत स्थिर वाढ झाल्यामुळे, ईटीएफ मागणीतील घट काही अंशी भरून निघाली. एकंदर, जगभरातील अनिश्चिततांचा विचार करता, यातील मागणीची बाजू सोन्याच्या किमतींसाठी फार अनुकूल राहिली नाही आणि मोबदल्याच्या आघाडीवर गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.